‘वयम्’ मासिकातर्फे 😄 इमोजी-पत्र स्पर्धा ✉️🖋️

१७ जुलै- ‘जागतिक इमोजी 😊😂😛 दिवसा’निमित्त जास्तीत जास्त ५० शब्दांचा छोटासा व्हॉटॅस्अप📱किंवा इमेल 📧 असलेले डिजिटल पत्र 📨‘वयम्’ मासिकाला लिहा. मात्र त्यात भरपूर इमोजी असावेत.

इमोजी पत्र स्पर्धा निकाल २०२१

इमोजी पत्र स्पर्धा- विजेत्यांचे अभिनंदन.

१७ जुलै- ‘जागतिक इमोजी दिवसा’निमित्त ‘वयम्’ मासिकातर्फे ‘इमोजी-पत्र स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. यात भरपूर इमोजी असलेले जास्तीत जास्त ५० शब्दांचे छोटेसे व्हॉटस्अप किंवा इमेल असलेले डिजिटल पत्र ‘वयम्’ मासिकाला मराठी किंवा इंग्रजी + इमोजी अशा रूपात लिहायचे होते. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून सुमारे ५० मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण ‘वयम्’ मासिकाच्या मुख्य संपादक शुभदा चौकर यांनी केले. स्पर्धकांचा इमोजी-वापर बघून आम्हला खूप मजा आली. सर्व सहभागींचे कौतुक! विजेत्यांचे अभिनंदन!

  • अत्रेय केदार देवस्थळी, पाचवी, रत्नागिरी.

  • जान्हवी ओम दांडेकर, सातवी, सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे

  • वरद सचिन कुलकर्णी, सातवी, डोंबिवली (पूर्व)

  • रावी प्रसाद नामजोशी, सातवी, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे

  • हर्षदा प्रमोद चव्हाण, दहावी, ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन, लातूर

  • प्रणव प्रमोद चव्हाण, सहावी, ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन, लातूर

  • मनश्री उदय काळे, आठवी, यशवंत हायस्कूल, कराड.

  • अनन्या अभिजीत सप्रे, सातवी, रत्नागिरी

  • श्रावणी संतोष सेलुकर, नववी, परभणी