Wayam Magazine

IPH

5 Sample Preview Questions

१६. तुझे छंद कोणते? विशेषतः कंटाळा आल्यावर, दमल्यावर काय केल्याने तू फ्रेश होतोस/होतेस? (कमाल शब्दमर्यादा ३०)

२४. तुझ्या आवडत्या मालिकेचा महाएपिसोड किंवा रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा नेमका परीक्षेच्या आदल्या दिवशी आहे. तुला तो कार्यक्रम बघावासा वाटतोय. मात्र अभ्यास तर केलाच पाहिजे.. अशा परिस्थितीत तू नेमके काय करशील? (कमाल शब्दमर्यादा ५०)

३४. कल्पना कर की, तुझं फेसबुकवर/ इंस्टाग्रामवर अकाउंट आहे आणि तुझ्या कुटुंबातील काही व्यक्तीही त्या माध्यमात आहेत. तर तू तुझ्या फ्रेंडलिस्टमध्ये त्यांना स्थान देशील का? कारणासह लिही. (कमाल शब्दमर्यादा ४०)

३६. पर्यावरण निर्देर्शाकात भारताचा क्रमांक १८० पैकी १७७ वा आहे. भारताचे स्थान वर सरकून ते किमान १७० वर यावे यासाठी तू स्वत: कोणती कृती करशील, जेणेकरून तुझा खारीचा वाटा आपल्या देशाला मिळेल? (कमाल शब्दमर्यादा ३०)

३९. मॉल आणि स्थानिक दुकान या दोघांचा संवाद सुरू आहे, अशी कल्पना करून संवादलेखन करा. (कमाल शब्दमर्यादा ५०)

१०० रुपये भरून प्रश्नावली डाउनलोड करा. तुम्ही आम्हाला उत्तरं स्कॅन करून ई-मेलवर iphwayamspardha17@gmail.com पाठवू शकता किंवा उत्तरं आम्हाला कुरिअरने पाठवा. जर तुमचा मुलगा/मुलगी पुढच्या फेरीसाठी पात्र झाले तर आम्ही तुम्हाला कळवू.
जर तुमच्याकडे क्रेडिट/डेबिट कार्ड नसेल तर खालील Bank Details वापरून तुम्ही पैसे भरु शकता आणि नंतर आम्हाला ते details ई-मेल वर पाठवा आणि आम्ही प्रश्नावली तुम्हाला ई-मेल करु.

Bank Details For Cheque/DD

Cheque / DD in the Name of: Labindia Analytical Instruments Pvt. Ltd.

Bank Name: Bank of India

Current A/c: 006820110000450

IFSC Code: BKID0000068

बक्षीस काय?

ट्रॉफी, सर्टिफिकेट, पुस्तके अशी बक्षिसे मिळतातच. पण मोठ्ठे बक्षीस म्हणजे तिन्ही फेऱ्यांनंतर निवडल्या गेलेल्या सर्व मुलांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर घेतले जाते. महाराष्ट्रभरातून निवडली गेलेली ही बहारदार मुलं शिबिरासाठी एकत्र येतात. डॉ आनंद नाडकर्णी आणि IPH चे मानसतज्ज्ञ त्यांना त्यांच्या विकासासाठी उपयुक्त शिदोरी देतात. आणि ही सर्व हरहुन्नरी मुलं एकमेकांच्या सहवासात आणखी फुलत जातात.

या स्पर्धेतून तुम्हाला काय मिळेल ?

  • या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या अंतरंगात डोकवाल.
  • स्वतःला नीट ओळखाल.
  • तुमची मते मोकळेपणाने मांडण्याची अनोखी संधी मिळेल.
  • अनेक तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल.
  • मनात दाटलेले अनेक प्रश्न, शंका दूर होतील.
  • तुमचा बहुअंगांनी विकास होईल आणि तुमच्यातील क्षमता तुम्हांला समजतील.
Watch Video For Dowloading Quessionnaire
How to Download Bahar Questionnaire's Video