बहुरंगी बहर स्पर्धा

गेली चार वर्षे ऑगस्ट महिन्यात आम्हाला वेध लागतात, ‘बहुरंगी बहर’ स्पर्धेत सहभागी झालेल्यांच्या उत्तरपत्रिका वाचण्याचे! यंदा मात्र करोंनाने निर्माण केलेल्या संकटामुळे आम्ही ‘बहुरंगी बहर’ ही स्पर्धा सध्यातरी घेऊ शकणार नाही. तसेच २०१९ मधील ‘बहुरंगी बहर’ विजेत्यांसाठी IPH आणि वयम् मासिक यांच्यातर्फे घेण्यात येणारे व्यक्तिमत्व शिबीरही अद्याप होऊ शकलेले नाही. परिस्थिती सुरळीत झाल्यावर पुढील सूचना देऊ.

 • 'बहुरंगी बहर' - हरहुन्नरी मुलांसाठी एक व्यक्तिमत्व स्पर्धा

  गेली 4 वर्षे तुफान यशस्वी ठरलेल्या 'बहुरंगी बहर' स्पर्धेचं हे चौथे वर्ष... तुम्हाला आवडेल आणि सहभागी व्हायला मजा येईल अशी ही स्पर्धा म्हणजेच, ‘बहुरंगी बहर’- उमलणारे व्यक्तिमत्व स्पर्धा! अधिक माहितीसाठी

‘बहुरंगी बहर’ - ‘हरहुन्नरी’ मुलांचा शोध-प्रकल्प!

सप्रेम शुभेच्छा!

पावसाळ्याच्या फ्रेश वळणावर आज तुमच्याशी एक धमाल नवा प्रोजेक्ट शेअर करायचा आहे. शाळेतल्या नव्या वर्षात रुळत असताना, तुम्हाला आवडेल आणि सहभागी व्हायला मजा येईल अशी ही स्पर्धा म्हणजेच, ‘बहुरंगी बहर’ - उमलणारे व्यक्तित्त्व स्पर्धा !

तुम्ही विचाराल, काय भानगड आहे? आणि कोणासाठी आहे ही स्पर्धा? ... महाराष्ट्रातील सातवी ते नववी इयत्तेतील हरहुन्नरी विद्यार्थी-विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. आता प्रश्न येईल की ‘हरहुन्नरी’ म्हणजे नेमके कोण कोण?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी हे पत्र -

‘बुद्धिमत्ता’ म्हणजे नेमके काय ह्या प्रश्नाचे उत्तर काळानुसार येणाऱ्या शास्त्रीय माहितीच्या आधारे बदलत गेलेले आहे. गेल्या शतकामध्ये जसजसा मानसशास्त्राचा आणि शिक्षणशास्त्राचा विकास होऊ लागला, तसे बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय आणि त्याचे मापन कसे करावे, अशा समस्या संशोधाकांसमोर आल्या. तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता, गणिती विचार करण्याची क्षमता, व्यवहाराचे आकलन, सामान्यज्ञान, अडचणींची उकल करण्याचे कसब अशा अनेक गुणांचा अंतर्भाव बुद्धिमत्तेमध्ये केला गेला. त्या आधारे अनेक IQ टेस्ट म्हणजे बुद्धिमापन चाचण्याही उपयोगात आल्या. हळूहळू लक्षात येऊ लागले की बुद्धीमत्ता काही एवढ्यापुरती मर्यादित नाही. कारण अशा मापनामध्ये उत्कृष्ट असलेले अनेकजण प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र यशस्वी ठरतात, असे नाही. अशा निरीक्षणांमुळे दोन विषयांमधल्या संशोधनाला गती मिळाली.

 • -रिया निधी सचिन पटवर्धन

  प्रिय शुभदामावशी, प्रिय आनंदकाका,

  ‘वयम् व्यक्तिमत्त्व २०१७’ ची विजेती झाल्यामुळे सगळीकडे भरपूर कौतुक होतंय. ‘वयम्’ टीमचे खूप खूप आभार, कृतज्ञता! आई सांगत असते, “पु.ल. म्हणायचे, कृतज्ञतेइतकं सुंदर काहीच नाही आणि कृतघ्नतेइतकं कुरूप काही नाही.” हे अगदी लक्षात राहिलंय... हा अनुभव दिलात म्हणून कृतज्ञता!!

 • -भक्ति अमित कोतवाल

  एक अनोखी स्पर्धा

  बहुरंगी बहर’ ही स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठीही एक सुंदर अनुभव होता. पहिल्या फेरीत विचारलेले ६० प्रश्न मुलांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे होते. या प्रश्नांची उत्तरे लिहिताना मुलांचे विचार, त्यांच्या भावना, त्यांची मते अगदी सहजपणे व्यक्त झाली. आनंद नाडकर्णी यांनी मुलांना हसतखेळत बोलते केले.

 • -अद्वैत देसाई

  खूप छान अनुभव

  ‘बहुरंगी बहर’ ही खूपच छान स्पर्धा आहे. त्यात पहिल्या फेरीत ६० प्रश्नी प्रश्नावली होती. ते प्रश्न EQ व SQ वर आधारित होते. पण ते प्रश्न मात्र चांगलेच अवघड होते बुवा! उदा. प्रश्न क्र.४३ व ४४ - त्यात असे विचारले होते की शिक्षकाने सर्वांसमक्ष तुमची टर उडवली तर तुम्ही काय कराल? मी म्हटलं, ”अरे बापरे, असे माझे एका क्लासमध्येच झाले आहे

 • -वेदिका नरवणे

  अंतरंगाचा शोध

  बहुरंगी बहर ! मला मिळालेलं एक वेगळंच यश! मुलाखत फेरीनंतर मला जेव्हा कळलं, की मी पहिल्या पाचात आलेली आहे, तेव्हा झालेला आनंद अवर्णनीय! या स्पर्धेमुळे डॉ. आनंद नाडकर्णी, नीलकांतीताई पाटेकर, समृद्धीताई पोरे, मिलिंद भागवत सर, पार्थ मीना निखील सर अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना मला खूप जवळून भेटता आले.

बक्षीस काय?

ट्रॉफी, सर्टिफिकेट, पुस्तके अशी बक्षिसे मिळतातच. पण मोठ्ठे बक्षीस म्हणजे तिन्ही फेऱ्यांनंतर निवडल्या गेलेल्या सर्व मुलांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर घेतले जाते. महाराष्ट्रभरातून निवडली गेलेली ही बहारदार मुलं शिबिरासाठी एकत्र येतात. डॉ आनंद नाडकर्णी आणि IPH चे मानसतज्ज्ञ त्यांना त्यांच्या विकासासाठी उपयुक्त शिदोरी देतात. आणि ही सर्व हरहुन्नरी मुलं एकमेकांच्या सहवासात आणखी फुलत जातात.

Powered By

आम्ही सोशल मीडिया वर आहोत, आमच्याशी कनेक्ट व्हा !

सतत विचारले जाणारे प्रश्न

‘बहुरंगी बहर’ म्हणजे बहुअंगाने बहरणाऱ्या मुलांचा शोध. बाकी बऱ्याच स्पर्धेमध्ये फक्त एका विशिष्ट कलेकडे भर दिला जातो. पण सगळ्या बाजूने छान बहरत आहे, फुलत आहे अशी मुलं ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये दडलेली आहेत. अशा मुलांच्या शोधासाठीच ‘बहुरंगी बहर’ प्रकल्प काढण्यात आला आहे.

Live Link या लिंक वर जाऊन 'बहुरंगी बहर' प्रश्नावली या बटनावर क्लिक करा. मग तुमची वैयक्तिक माहिती भरून १०० रु. भरा. पेमेंट झाल्यावर (Click Here to Download Bahurangi Bahar Questionnaire) या बटनावर क्लिक करा. प्रश्नावली तुमच्या डाउनलोड लिस्ट मध्ये दिसेल.

बहुरंगी बुद्धीमत्ता असलेल्या मुलांची दरवर्षी दखल घेतली गेली पाहजे आणि नवीन येणाऱ्या पिढीला त्यांच्या उमलत्या वयात योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे या उद्देशाने ‘बहुरंगी बहर’ स्पर्धा दरवर्षी आयोजित केली गेली जाते.

बहुरंगी बुद्धीमत्ता म्हणजेच ‘Thoughts of multiple intelligence’! तबल्याच्या लयतालाचे गणित सहज आत्मसात करणारी व्यक्ती पुस्तकी गणितात कच्ची ठरते... एखाद्या क्रीडाप्रकारामध्ये अप्रतिम कौशल्य दाखवणारी व्यक्ती डबल ग्रॅज्युएट असायलाच हवी असे नाही... कुठल्याही बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण न घेता कर्तृत्ववान उद्योजक बनता येते. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये बुद्धीचे एकापेक्षा जास्त Flavors आहेत आणि त्या व्यक्तीचे आयुष्य सर्वांगाने फुलून येते तो / ती जगण्याचा आनंद तर लुटतेच, पण समाजालाही योगदान देऊ शकते.

स्पर्धेत भाग घेतल्यानंतर मुलांचा आत्मविश्वास वाढतोच त्याचबरोबर त्यांची चहू बाजूने विचार करण्याची क्षमताही वाढते.

हो, या स्पर्धेमुळे मुलांची शैक्षणिक, सामाजिक, आणि मानसिक जडण-घडण केली जाते. तसेच ‘बहुरंगी बहर’च्या विजेत्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल.

एक असं हक्काचं व्यासपीठ जिथे मुलांना त्यांची मतं मोकळेपणाने मांडता येतात. ज्यात मुलं विचार काय करतात, त्यांची निर्णयक्षमता कशी आहे. त्या मुलांची एखाद्या संकल्पनेवरची मतं काय आहेत आणि ती कशी मांडतात असे स्वतः ची ओळख करून देणारे प्रश्न या प्रश्नवली मध्ये विचारले जातात.

तुम्ही तुमची उत्तरं स्कॅन करून आम्हाला iphwayamspardha17@gmail.com या ई-मेल आयडी वर पाठवा.

किंवा

‘वयम्’, न्यू वंदना को.ऑ.हौ. सोसायटी, ३ रा मजला, लाल बहादूर शास्त्री मार्ग, वंदना सिनेमाजवळ, ठाणे ४००६०२

या पत्त्यावर कुरियर करू शकता.

 1. या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या अंतरंगात डोकवाल.
 2. स्वतःला नीट ओळखाल.
 3. तुमची मते मोकळेपणाने मांडण्याची अनोखी संधी मिळेल.
 4. अनेक तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल.
 5. मनात दाटलेले अनेक प्रश्न, शंका दूर होतील.
 6. तुमचा बहुअंगांनी विकास होईल आणि तुमच्यातील क्षमता तुम्हांला समजतील.