अभिवाचन स्पर्धा निकाल २०२०

मराठी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ‘वयम्’ अभिवाचन स्पर्धेला फार उत्तम प्रतिसाद मिळाला. केवळ ५-६ दिवसांत १०० हून जास्त मुलांनी सहभाग घेतला. मराठी, इंग्रजी, जिल्हा, परिषद, नगरपालिका, खासगी, अनुदानित सर्व प्रकारच्या शाळांमधील मुलांनी ‘वयम्’मधील मराठी साहित्य समजून घेऊन वाचलेय. कोणी गोष्ट, कुणी माहितीपर लेख, कोणी कविता, कोणी विचार देणारा लेख... असे ‘वयम्’मधील सर्व प्रकारचे साहित्य मुले आवडीने वाचताहेत, हे बघून खूप समाधान वाटले.

दृष्टीदोष असलेला मुलगासुद्धा ‘वयम्’ नियमित वाचतो आणि स्पर्धेत भाग घेतो, हे या निमित्ताने समजले आणि आमचे डोळे व मन भरून आले.

आम्ही प्रत्येक व्हिडिओ डाउनलोड करून पाहिला. मुलांचे वय बघून त्यानुसार निवड केली.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मुलांना धन्यवाद. त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे आभार. मुलांच्या वाचनाचे शूटिंग करून ते ‘वयम्’कडे पाठवण्याचा प्रयास त्यांनी उत्साहाने केला.

असेच वाचत राहा! कारण- ‘वयम्’चे बोधवाक्य आहे- वाचनातून विचार, विचारातून विकास!

‘वयम्’च्या प्रथेप्रमाणे पहिला, दुसरा क्रमांक काढलेला नाही. उत्कृष्ट १६ आणि उत्तेजनार्थ १६ अशा दोन श्रेणी केल्या आहेत. या दोन्ही श्रेणींत मिळून ३२ मुले निवडली गेली आहेत. या ३२ विजेत्यांना प्रमाणपत्र मिळेलच, शिवाय त्यांचे व्हिडिओ ‘वयम्’च्या वेबसाईटवर, फेसबुकवर प्रसिद्ध केले जातील.

- ‘वयम्’टीम