प्रतिक्रिया


Testimonial

कृतज्ञता!

प्रिय शुभदामावशी, प्रिय आनंदकाका,

‘वयम् व्यक्तिमत्त्व २०१७’ ची विजेती झाल्यामुळे सगळीकडे भरपूर कौतुक होतंय. ‘वयम्’ टीमचे खूप खूप आभार, कृतज्ञता! आई सांगत असते, “पु.ल. म्हणायचे, कृतज्ञतेइतकं सुंदर काहीच नाही आणि कृतघ्नतेइतकं कुरूप काही नाही.” हे अगदी लक्षात राहिलंय... हा अनुभव दिलात म्हणून कृतज्ञता!!

मी चित्रकलेची परीक्षा सोडून स्पर्धेसाठी आले तेच मुळी नवं शिकता यावं, पाहता यावं म्हणून. ते मी अनुभवलं! गटचर्चा हा माझ्यासाठी एक नवा विषय होता. आमच्या शाळेत ‘Debate’ होतं, (तिथेही एखादा मुद्दा घेऊन भांडायचं कसं हेच शिकवलं जातं! पण Group Discussion हा पूर्ण नवा विषय होता. एखाद्या conclusion ला यायचं तेही नेमकेपणानं, हे मजेदार होतं. सगळीच मुलं बोलकी होती. क्रांतीताईनं आम्हां सगळ्यांची छान काळजी घेतली. तिला ‘Big Hello’!

दुस-या दिवशी मी खूप Relax होते, selection ची भीती अजिबात वाटत नव्हती, पण उत्सुकता मात्र होती. माझं selection जेव्हा झालं तेव्हा मी हवेतच होते... मस्तपैकी उडत उडत; मात्र hot seat वर बसल्यावर एकदम गरमच व्हायला झालं, पण आनंदकाकांनी आम्हांला इतकं cool व relax केलं की भीती मुळी दूरच पळून गेली. विंदांच्या २०-२५ बालकविता तरी मला पाठ आहेत, पण त्यांचं ‘जन्मशताब्दी वर्ष’ आहे हे मात्र मला माहिती नव्हतं, याचं वाईट वाटलं.

या सर्व प्रवासात माझी झोपडपट्टीत राहणारी मैत्रीण यास्मीन हिची निवड होऊनही ती येऊ शकली नाही, याचं वाईट वाटलं. पण ती शिबिराला आली तर चालेल का?

- रिया निधी सचिन पटवर्धन, रत्नागिरी

Testimonial

एक अनोखी स्पर्धा

बहुरंगी बहर’ ही स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठीही एक सुंदर अनुभव होता. पहिल्या फेरीत विचारलेले ६० प्रश्न मुलांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे होते. या प्रश्नांची उत्तरे लिहिताना मुलांचे विचार, त्यांच्या भावना, त्यांची मते अगदी सहजपणे व्यक्त झाली. दुस-या फेरीतही स्वत:चे मत ठामपणे मांडण्याचा आत्मविश्वास मुलांमध्ये दिसला. तिस-या मुलाखत फेरीत डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मुलांना हसतखेळत बोलते केले. त्या २४ तारखेला काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात बसून आम्ही पालक राजकारणापासून खेळापर्यंत, बारामतीच्या हिरव्या नकाशापासून ते नाशिकच्या कुंभमेळ्यापर्यंत लीलया फेरफटका मारून आलो. अभ्यासाबरोबरच अनेक कलाकौशल्ये आत्मसात करत असलेली ही सर्वच मुले किती प्रगल्भ विचार करतात हे आम्हां पालकांना या स्पर्धेच्या निमित्ताने कळले. या स्पर्धेत निवडलेल्या ५० हि-यांना पैलू पडण्याचे कार्य IPH संस्था करणार आहे. डॉ. आनंद नाडकर्णी आणि IPH संस्थेकडून मिळणारे हे मार्गदर्शन या मुलांचे भविष्य समृद्धपणे उजळवेल, यात शंकाच नाही!

-भक्ति अमित कोतवाल

Testimonial

खूप छान अनुभव

‘बहुरंगी बहर’ ही खूपच छान स्पर्धा आहे. त्यात पहिल्या फेरीत ६० प्रश्नी प्रश्नावली होती. ते प्रश्न EQ व SQ वर आधारित होते. पण ते प्रश्न मात्र चांगलेच अवघड होते बुवा! उदा. प्रश्न क्र.४३ व ४४ - त्यात असे विचारले होते की शिक्षकाने सर्वांसमक्ष तुमची टर उडवली तर तुम्ही काय कराल? मी म्हटलं, ”अरे बापरे, असे माझे एका क्लासमध्येच झाले आहे खरे; पण ते लिहिणार कसे?” एका प्रश्नात तर अमिताभ बच्चन, मोदी, अंबानी, सचिन यांचे चांगले व वाईट गुण लिहायचे होते. मी वाईट गुण इंटरनेटवर शोधले व लिहिणार, इतक्यात बाबा म्हणाले, “या माणसांना आपण स्वत: ओळखत नाही, त्यांच्या वागण्याचा आपल्याला काहीही अनुभव नाही. त्यांच्या स्वभावातल्या न पटलेल्या गोष्टी आपण कशा सांगणार?” ही गोष्ट मला पटली.

दुसरी फेरी म्हणजे गटचर्चा होय. त्यात वेगवेगळे विषय आयत्यावेळी दिले. आम्हांला त्यात पहिला विषय ‘भेदभाव’ हा मिळाला. मला तर प्रश्नच पडला. आईने सांगितल्यानुसार मी कमी, पण मुद्देसूद बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जर भेदभाव आहे तर तो कशामुळे आहे, मग आपण तो कसा मिटवू शकतो, यांवर बोललो. नंतरचा विषय ‘युनिफॉर्म’ होता. गटचर्चेपेक्षा मी पहिल्यांदाच खूप कमी वेळात ब-याच जणांशी ओळखी बनवल्या, याचे समाधान वाटले.

तिसरी फेरी ‘मुलाखत’ होती. आधी आम्हांला जिल्ह्यांनुसार उभे केले व सगळ्यांना स्टेजवर नेले. त्यांनतर आम्ही खाली प्रेक्षागृहात बसलो. प्रथम त्यांनी आमच्यातल्या एका मुलीला बोलविले व तिला स्टेजवरच्या मधल्या जागेत २०० प्रेक्षकांपुढे बसवले. मी मनातून म्हणालो, ”माझी पाळी आली तर माझी काही खैर नाही.” पण पुढची पाळी माझीच आली. स्टेजवर जाताना जाम भीती वाटत होती. त्यांनी मला काही प्रश्न बुद्धिबळावर, काही माझ्या उत्तरपत्रिकेवर तर काही पेटीवर विचारले. माझ्यासाठी दोन प्रश्न ‘out of box’ होते. ते म्हणजे पेटीचे दुसरे नाव काय? व ‘आळशीपणाचे फायदे’! माझ्यानंतर ब-याच मुलांनी खूप छान गाणी व कविता म्हटल्या. परीक्षकांनी आमच्या ६० उत्तरांचे सखोल वाचन केले होते. आमच्यावर प्रेशर न पाडता तो कार्यक्रम हसत-खेळत पार पाडला. स्टेजवर आनंदकाकांनी खूप सांभाळून घेतले. त्यांनतर बक्षिस समारंभ पार पडला. त्यात मला विजेतेपद मिळाले. मला ही स्पर्धा खूप आवडली.

अद्वैत देसाई
अ.भि.गोरेगावकर शाळा, गोरेगाव, मुंबई
इयत्ता-७ वी

Testimonial

अंतरंगाचा शोध

"technology ने केलाय बाह्यरंगाचा कहर,
अंतरंग शोधूया, स्पर्धा देऊया, बहुरंगी बहर"

बहुरंगी बहर ! मला मिळालेलं एक वेगळंच यश! मुलाखत फेरीनंतर मला जेव्हा कळलं, की मी पहिल्या पाचात आलेली आहे, तेव्हा झालेला आनंद अवर्णनीय!
या स्पर्धेमुळे डॉ. आनंद नाडकर्णी, नीलकांतीताई पाटेकर, समृद्धीताई पोरे, मिलिंद भागवत सर, पार्थ मीना निखील सर अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना मला खूप जवळून भेटता आले.
या स्पर्धेमुळे माझे स्वतःकडे आणि इतरांकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलले. विचारप्रक्रिया बदलली. माझ्याच वयाची इतर मुलं खूप काय काय करत असतात,हे या स्पर्धेमुळे कळळे. नवे मित्र-मैत्रिणी मिळाले.
IPH आणि वयम् या दोन संस्थांनी मिळून आम्हा मुलांना स्वतःत डोकावायला शिकवलं आहे. या अनुभवामुळे माझ्या ओळखीतले अनेक मित्र-मैत्रिणीही अंतरंगाचा शोध घ्यायला उत्सुक आहेत.
---- वेदिका नरवणे, बदलापूर, इयत्ता -
IES कात्रप विद्यालय , बदलापूर

Testimonial

स्वतःला समृद्ध करण्याचा प्रवास

"बहुरंगी बहर" या स्पर्धेमुळे माझ्या मुलीमधे तर खूप बदल झालाच आहे, पण आई-बाबा म्हणून आमचं पालकत्व समृद्ध व्हायला लागलं आहे. या स्पर्धेत भाग घेतलेली वेदिका आणि पहिल्या पाचात आलेली वेदिका यातही बराच बदल आम्हा घरातल्या माणसांना जाणवला होता.

आपल्याला बऱ्याच गोष्टी येत असल्या तरी विचारांच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत आणि आपल्या क्षमतांचा नीट वापर करता आला पाहिजे, हा समृद्ध अनुभव या स्पर्धेतील मुलाखत फेरीने वेदिकाला आणि पालक म्हणून आम्हांलाही दिला.

‘बहुरंगी बहर’ ही स्पर्धा मुलांच्या जाणिवा विकसित करणारी स्पर्धा आहे. बहुरंगी बहर आणि त्याच प्रवासात पुढे मिळणार्‍या कार्यशाळा म्हणजे मुलांनी स्वतःची प्रत्येक टप्प्यावर ओळख करून घेत स्वतःची स्वतःशीच स्पर्धा करत स्वतःला समृद्ध करणे होय.

IPH आणि वयम् यांचे आम्ही ऋणी आहोत. ‘वयम्’च्या पुढील वाटचालीस मन:पुर्वक शुभेच्छा.

- वेदिकाची आई

Testimonial

समृद्ध अनुभवाची शिदोरी

२३ आणि २४ सप्टेंबरला ‘बहुरंगी बहर’च्या निवडक मुलांची फेरी होती. आपली रत्नं तिथे काय दिवे लावणार आहेत, याचं प्रत्येक पालकांना कमी-अधिक प्रमाणात टेन्शन होतं. मला वाटतं की, हा उपक्रम म्हणजे मुलं, पालक, वयम् आणि IPH ची टीम, तसेच परीक्षक या सर्वांच्याच दृष्टीने काहीतरी वेगळं देण्या-घेण्याचा, अनुभवण्याचा कसोटीचा काळ होता.

२३ ला सकाळपासूनच गटचर्चा म्हणजेच Group Discussion ला सुरुवात झाली. प्रत्येक Team ला वेळेचं बंधन आणि वेगवेगळे विषय दिले गेले होते. वरवर तर सोपे पण तसे कठीणसुद्धा, अशी ब-याच मुलांची अवस्था झाली. बरीचशी मुलं तिथे खूप छान मोकळी झाली. सर्वांगाने विषय मांडले जात होते. अर्थात आम्हां पालकांना तिथे प्रवेश नव्हता. परंतु हे सर्व बाहेर आल्यानंतर मुलांच्या चिवचिवाटातूनच कळले. बाहेर पडल्यानंतरही मुलं त्या विषयांवर एवढं उत्स्फूर्तपणे बोलत होती की बास्स!

आम्हां पालकांचीही २३ ला गटचर्चा रंगात आली. महाराष्ट्रातून कुठून कुठून पालक आले होते.

२४ ला व्यासपीठावर मुलांनी जे बुद्धीप्रदर्शन केले, त्याने मी अवाक् झाले. एक तर ७ वी ते ९ वी हा वयोगट म्हणजे आत्ता बालपणातून पौगंडावस्थेकडे प्रवासाला सुरुवात करणारा काळ. या वयात मुलांची स्वतंत्र मतं तयार होणं, आपलं तेच खरं वाटणं, नवीन वाटा शोधणं, त्यावर चालून बघण्याचा प्रयत्न करणं ‘व्यक्त व्हावं की न व्हावं?’ या द्विधेत राहणं, अशा अनेक दोलायमान अवस्थेतलं बालिश आणि त्याचबरोबर तारुण्याच्या आकर्षणाचं वय. पण या अशा बहुरंगी मुलांना छान बोलतं केलं या उपक्रमाने.

‘बहुरंगी बहर’ म्हणजे नेमकं काय? आणि मुलांमध्ये हे बहुरंग असतात त्याला बाहेर, पडायला वाव मिळावा म्हणूनच हा खटाटोप का केला जातोय, या संकल्पनेचं इतकं सुंदर विश्लेषण मला वाटतं डॉ. आनंद नाडकर्णींशिवाय उत्तमरीत्या दुसरं कुणी करूच शकत नाही. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं आपलं आराध्यदैवत श्रीगणेशाचं, जो ६४ कलांनी युक्त आहे आणि त्याला जोड दिली ज्येष्ठ विचारवंत आणि मानसतज्ज्ञ Gardner यांची.

ज्येष्ठ अभिनेत्या नीलकांती पाटेकर या एक परीक्षक होत्या. काय चतुरस्र ज्ञान आहे त्यांचं. फार परखड विचार आणि स्पष्ट बोलणं ! अनेक विषयांतले बारकावे हेरून मुलांना नेमके प्रश्न विचारून त्यांचे मेंदू पॉलिश केले त्यांनी! कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळेसही त्यांनी जे काही मुलांना सांगितलं, ते वाक्य न् वाक्य कानात भरून ठेवलं आहे. तसेच पार्थ मीना निखिल, समृद्धी पोरे व मिलिंद भागवत यांनीही मुलांच्या छान मुलाखती घेतल्या.

मुख्य संपादक शुभदा चौकर यांनीही ‘वयम्’ची वाटचाल आणि मुलांचा ‘वयम्’बद्दल असणारा विश्वास, त्या विश्वासास पात्र राहण्याकरिता संपूर्ण ‘वयम्’ व IPH ची टीम घेत असलेली मेहनत याबद्दल थोडक्यात सांगितलं. ‘वयम्’चे प्रकाशक श्रीकांत बापट यांनी ‘वयम्’चा जन्म आणि भूमिका याबद्दल मनापासून माहिती दिली.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना ‘याची देही, याची डोळा’ बघण्या-ऐकण्याचं, त्यांच्याशी बोलण्याचं भाग्य आम्हांला आमच्या मुलांमुळे लाभलं. अतिशय संयमी, शांत, मितभाषी आहेत डॉ. काकोडकर. एवढ्याशा आमच्या मुलांचं त्यांनी ऐकून घेतलं आणि कौतुक केलं. एकंदरीतच या अनुभवाची शिदोरी मला आणि माझ्या मुलाला आयुष्यभर साथ देईल.
- नेत्रा व हृषीकेश नरवणे, बदलापूर

Testimonial

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो

2016 या वर्षी ‘वयम्’ मासिक आणि आणि आय.पी.एच यांच्या संयुक्त विद्यमाने घेतल्या गेलेल्या बहुरंगी बहर या एका आगळ्या-वेगळ्या स्पर्धेत मी भाग घेतला होता. आणि त्यात माझी निवड झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र भरातून मुले आली होती. त्यांच्याशी संवाद साधण्याची , त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकण्याची सुवर्ण संधी मला मिळाली.
गेल्या वर्षी व ह्या वर्षी मी एप्रिल महिन्यात एक अनोखे आगळेवेगळे शिबीर अनुभवले. यात खूप वेगवेगळ्या मोठ्या व्यक्तिमत्वाना मला भेटता आले. त्यात आनंद नाडकर्णी यांनी स्वतः आम्हांला करियर मार्गदर्शन केले. तसेच या शिबिरात विविध गोष्टी मला शिकायला मिळाल्या.
या शिबिरातून मला अनुभवांची पोतडी मिळाली. मी या उपक्रमावर खूप खुश आहे. तुम्हांलाही ऐकून उत्सुकता वाटली असेल तर यावर्षीच्या ‘बहुरंगी बहर’- २०१८ची प्रश्नावली नक्की भरून पाठवा. नियम, सुचना सगळं प्रश्नावलीमध्ये लिहिलेले आहे. तर मग लवकर प्रश्नावली भरा आणि पाठवा ‘वयम्’च्या पत्त्यावर ! अधिक माहितीसाठी www.wayam.in ही वेबसाइट पाहा.

-असीम आव्हाड

Testimonial

Hi friends,

In 2016 I witnessed a very rare competition which was a very interesting one. This competition initially had three stages for emerging as a winner. I was very lucky one to have passed all three stages and emerge as runner-up. In this process I got to know many things and was introduced to many talented children of Maharashtra.
As I was selected we all had a summer camp which was a fun filled one with lot of knowledgeable people coming and sharing us their knowledge. The camp taught me many new things that are needed to become a good human being.
I am thankful to wayam and IPH for all this.If you also want to enrich all these things please fill the questionnaire for BB 2018. All rules and information is provided in the questionnaire. So be fast and submit the questionnaire. For more information log in to www.wayam.in

-Prajyot Walzade

Testimonial

नमस्कार पालकमित्र,

गेल्यावर्षी आम्ही एका आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचा अनुभव घेतला....ती स्पर्धा म्हणजे ‘बहुरंगी बहर!’ त्याच्यात माझी मुलगी वेदिका ह्रषिकेश नरवणे हिची निवड झाली. कळी उमलुन फुल होण्यापुर्वीच्या या मुग्धावस्थेत वेदिकाला ‘बहुरंगी बहर’ची स्पर्धा आणि एप्रिलच्या शिबिराचा अनुभव घेता आला. या वयात स्वतःच्या बाह्यरूपावर मुली जास्त लक्ष देतात; हे अगदी स्वाभाविक आहे परंतु बहुरंगी बहरमुळे आमची लेक स्वतःच्याच अंतरंगात डोकवायला शिकली आणि स्वतःचीच ओळख नव्याने स्वतःला आणि आम्हाला करुन देऊ लागली.
एप्रिलच्या शिबिरात सर्व तज्ञ व्यक्तींनी घेतलेल्या विविध सत्रांमुळे आम्हां मायलेकींमधला संवाद मैत्रीरुपी होऊ लागला आहे. वेदिकाचं व्यक्तीमत्व आणि आमचं पालकत्व दिवसेंदिवस समृध्द होत आहे ते ‘बहर’मुळेच... आमच्यासारखाच तुम्हालाही हा अनुभव घ्यावासा वाटतोय ना?......तर यावर्षीच्या ‘बहुरंगी बहर’-२०१८ ची प्रश्नावली नक्की भरून पाठवा. नियम, सुचना सगळं प्रश्नावलीमध्ये लिहिलेले आहे. तर मग लवकर प्रश्नावली भरा आणि पाठवा ‘वयम्’च्या पत्त्यावर ! अधिक माहितीसाठी www.wayam.in ही वेबसाइट पाहा.

-सौ.नेत्रा ह्रषिकेश नरवणे.
(वेदिकाची आई)

Vedika

नमस्कार मित्र-मैत्रिणिंनो,

मी वेदिका नरवणे. २०१७ च्या ‘बहुरंगी बहर’ या आगळ्या-वेगळ्या स्पर्धेत मी भाग घेतला होता; गंमत म्हणजे माझी चक्क पहिल्या ५ मुलांमधे निवड झाली. मुलाखतीसाठी त्या Hot chair वर बसल्यावर डॉक्टर काकांनी बोलायला सुरुवात केली तेंव्हा मात्र एकदम cool वाटलं. त्यानंतर अजुन एक छान अनुभव म्हणजे एप्रिलमधे झालेलं शिबिर!
खूप वेगवेगळ्या विषयांवर अनेक नवीन मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारता आल्या. शिबीरसत्रांमधुन अनेक क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन आणि आपल्यासारख्या teen agers ना निर्माण होणाऱ्या शंकांची सर्व उत्तरं बहरमधेच मिळाली.
मला तर वाटतं, प्रत्येकाने हा अनुभव घ्यायलाच हवा... चला तर मग येताय ना.. ‘बहुरंगी बहर’च्या या बहुरंगी रंगात रंगायला? यावर्षीच्या ‘बहुरंगी बहर’-२०१८ ची प्रश्नावली नक्की भरून पाठवा. नियम, सूचना सगळं प्रश्नावलीमध्ये लिहिलेले आहे.
तर मग लवकर प्रश्नावली भरा आणि पाठवा ‘वयम्’च्या पत्त्यावर! अधिक माहितीसाठी www.wayam.in

-वेदिका ह्रषिकेश नरवणे.
इ.८ वी...
IES.कात्रप विदयालय,बदलापूर

Ishant

नमस्कार पालकमित्र,

'बहुरंगी बहर' हा महाराष्ट्रातील एक अत्यंत अभिनव प्रयोग. त्याची सुरुवातच अनोख्या प्रश्नावलीतून होते. विद्यार्थी,पालकांसाठीही तो आनंददायी अनुभव आहे. बहुरंगीचे 'विकास शिबीर' हा त्यावरचा कळस. आमच्या मते ही स्पर्धा खचितच नव्हे, आत्मशोधाच्या प्रवासाची ती एक सुरुवात आहे. मुलांसाठी आणि पालकांसाठीही. त्यातून आमची कन्या ईशितामध्ये एक सकारात्मक बदल घडताना आम्ही पाहतो आहोत.
प्रश्नावली हे केवळ निमित्त, पण त्यामुळे मुलांचं आपल्याच मनात थोडं डोकावणं, स्वतःलाच थोडं चाचपून पाहणं होईल. कदाचित आपल्या भावी आयुष्याची सुयोग्य दिशाही त्यांना इथेच मिळून जाईल. अगदीच काही नाही, तर आपल्यातल्या क्षमतांचं, कोणत्या दिशेनं आपल्याला जायचंय आणि कोणत्या दिशेनं नाही, याचं भान तरी मुलांना नक्कीच येईल. न जाणो, हा आत्मशोध कदाचित स्वतःलाही अपरिचित अशा नव्याच'मी'लाही जन्म दऊन जाईल !
'बहुरंगी बहर' ही मुलांमध्ये सकारात्मक बदल घडवू शकणाऱ्या जिज्ञासू प्रयोगातील सहभागाची एक नामी संधी आहे आणि ती प्रत्येकानं घ्यायला हवी असं आम्हाला वाटतं. चला तर मग लवकर प्रश्नावली भरा आणि पाठवा ‘वयम्’च्या पत्त्यावर! अधिक माहितीसाठी www.wayam.in ही वेबसाइट पाहा.

- सौ. छाया व श्री. समीर मराठे
(ईशिताचे आई-बाबा)

Sawant

नमस्कार पालकमित्र,

गेल्यावर्षी माझ्या पाल्याने एका आगळ्या-वेगळ्या स्पर्धेत भाग घेतला होता. ती स्पर्धा म्हणजे ‘बहुरंगी बहर!’ त्याच्यात माझा मुलगा आशय गोडबोले याची निवड झाली. महाराष्ट्रभरातून आलेल्या मुलांशी बोलण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची संधी माझ्या पाल्याला मिळाली.
आणि मग मे महिन्याच्या सुट्टीत एक अनोखे शिबिर माझ्या पाल्याने अनुभवले. त्यात खूप तज्ञांना भेटता आलं. स्पर्धे व शिबिरामुळे व्यक्तिमत्त्वात अनेक महत्त्वपूर्ण आणि विकासात्मक बदल पाहायला मिळाले. ‘बहुरंगी बहर’च्या प्रकल्पावर आम्ही पालक खूप खुश आहोत.
तुम्हांलाही ऐकून उत्सुकता वाटली असेल तर यावर्षीच्या ‘बहुरंगी बहर’- २०१८ची प्रश्नावली नक्की भरून पाठवा. नियम, सुचना सगळं प्रश्नावलीमध्ये लिहिलेले आहे. तर मग लवकर प्रश्नावली भरा आणि पाठवा ‘वयम्’च्या पत्त्यावर ! अधिक माहितीसाठी www.wayam.in

-सावनी गोडबोले
( २०१६च्या बहुरंगी बहर स्पर्धेतील विजेता आशय गोडबोलेची आई)

Rajshri

नमस्कार पालकमित्र,

गेल्यावर्षी माझी मुलगी मुद्रा पांड्ये हिने एका आगळ्या-वेगळ्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात तिची निवड झाली. महाराष्ट्रभरातून आलेल्या मुलांशी बोलण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची संधी तिला मिळाली. स्पर्धेत आलेली सगळीच मुलं प्रत्येक काम अतिशय प्रामाणिकपणे करत होती. त्यामुळे मुद्राला असं जाणवलं की प्रामाणिकपणा गूण फारच महत्त्वाचा आहे आणि तो कधीच सोडता कामा नये.
शिवाय मोकळेपणाने चर्चा करण्याचं जणु प्रशिक्षणच तिथे मिळालं.
आणि मग मे महिन्याच्या सुट्टीत एक अनोखे शिबिर तिने अनुभवले. खूप तज्ञांना भेटता आलं. जीवनाचे विविध पैलू जवळून पाहता आले. आयुष्य विविधांगी आहे आणि दुसऱ्याच्या विचारांचा आदर करता आला पाहिजे हे मुद्राच्या लक्षात आलं. केवळ शाळेतले गूण म्हणजे सगळं नाही, आपला छंदही महत्त्वाचा आहे असं तिला जाणवलं. ‘बहुरंगी बहर’च्या प्रकल्पावर आम्ही खूप खुश आहोत. खरं तर अशी संधी प्रत्येकाला मिळायला हवी आणि निदान आपल्या पाल्याला तर मिळावीच.
तुम्हांलाही ऐकून उत्सुकता वाटली असेल तर यावर्षीच्या ‘बहुरंगी बहर’- २०१८ची प्रश्नावली नक्की भरून पाठवा. नियम, सुचना सगळं प्रश्नावलीमध्ये लिहिलेले आहे. तर मग लवकर प्रश्नावली भरा आणि पाठवा ‘वयम्’च्या पत्त्यावर ! अधिक माहितीसाठी www.wayam.in ही वेबसाइट पाहा.

-राजश्री कार्लेकर
( मुद्रा पाण्डेय ची आई)

Ajay

नमस्कार पालकमित्र,

गेल्याच्या गेल्या वर्षी माझा मुलगा सिद्धार्थ याने ‘बहुरंगी-बहर’ या आगळ्या वेगळ्या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेची जी प्रश्नावली होती ती सिद्धार्थने प्रामाणिक उत्तरे देऊन ‘वयम्’कडे पाठवली. ही उत्तरे वाचून मला त्याच्या मानसिकतेची जाणीव नव्याने झाली. या स्पर्धेतील निवडक ५०मध्ये त्याची निवड झाली. मग फायनलिस्ट १०मध्ये तो उपविजेता झाला. यानंतर मे महिन्यात या निवडक विद्यार्थ्यांसाठी एक अनोखे, बहुआयामी असे शिबीर पार पडले. त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वात अनेक उत्तम बदल झाले आणि हुरूप वाढला.
‘बहुरंगी-बहर’ या प्रकल्पावर आम्ही पालक म्हणून खूप खुश आहोत. कारण पुढे मिळणाऱ्या शिबिरातून मुलांचा सर्वांगीण विकास प्रत्यक्षरित्या अनुभवायला मिळतो. त्यांच्यातील उणीवा दूर होतात. अनेक तज्ज्ञ मंडळी मुलांशी संवाद साधून त्यांचे अंतरंग उलगडून, अंतर्मन जाणून त्यांत सकारात्मक आणि सकस बीज रोवण्याची किमया यात पाहायला मिळते.
तुम्हांलाही ऐकून उत्सुकता वाटली असेल तर यावर्षीच्या ‘बहुरंगी बहर’- २०१८ची प्रश्नावली नक्की भरून पाठवा. नियम, सुचना सगळं प्रश्नावलीमध्ये लिहिलेले आहे. तर मग लवकर प्रश्नावली भरा आणि पाठवा ‘वयम्’च्या पत्त्यावर ! अधिक माहितीसाठी www.wayam.in

-अजय सावंत
( सिद्धार्थ सावंतचे बाबा)

Aabha

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो

2 वर्षांपूर्वी मी एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेत भाग घेतला होता त्याच्यात माझी निवड झाली...महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या मुलांना भेटता आलं... आणि त्याच मित्र मैत्रिणींबरोबर मे महिन्याच्या सुट्टीत एक अनोखे शिबीर अनुभवता आले... वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञांची भेट घेता आली, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं... ते शिबीर माझ्यासाठी वर्षभरासाठीचं 'इंधन' आहे...
तुम्हांलाही ऐकून उत्सुकता वाटली असेल तर यावर्षीच्या ‘बहुरंगी बहर’- २०१८ची प्रश्नावली नक्की भरून पाठवा. नियम, सुचना सगळं प्रश्नावलीमध्ये लिहिलेले आहे. तर मग लवकर प्रश्नावली भरा आणि पाठवा ‘वयम्’च्या पत्त्यावर ! अधिक माहितीसाठी www.wayam.in ही वेबसाइट पाहा.

-आभा पटवर्धन