बातम्या आणि चालू घडामोडी

सावली हरवतेय का बघा!


येत्या गुरुवारी, १६ मे रोजी मुंबईत तर ठाणे, डोंबिवली, कल्याण अशा मुंबईच्या आसपासच्या काही ठिकाणी शुक्रवार, १७ मे रोजी हा सावली हरवण्याचा दिवस आहे, असे म्हणतात. पण हे खरे आहे का ते तुम्ही स्वत: निरीक्षण करून ठरवा. म्हणजे या दिवशी दुपारी १२-१२.३० वा उन्हात उभे राहून स्वत:च्या सावलीकडे बघा. जर उन्हात स्वत: उभे राहण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही आडोशाला रहा आणि एखाद्या झाडाची, खांबाची सावली पडते की नाही, हे बघा. तुमची निरीक्षणे आम्हाला कळवा.

का बरे हरवते सावली?

सूर्य रोज दुपारी डोक्यावर येत असला तरी तो रोज आकाशाच्या अगदी मध्यावर म्हणजे अगदी बरोब्बर आपल्या डोक्यावर येत नाही. वर्षातून फक्त दोनदाच तो त्या-त्या ठिकाणच्या आकाशाच्या मध्यावर येतो. हे ज्या दिवशी भर दुपारी घडते, तो दिवस त्या ठिकाणचा सावली हरवण्याचा दिवस (Zero Shadow Day) म्हणून ओळखला जातो... अधिक वाचा

चळवळी ग्रेटा


दि. ३ जानेवारी २००३ या दिवशी जन्माला आलेली स्वीडनची ग्रेटा थुनबर्ग ही आता १६ वर्षांची आहे. शाळकरी वयातल्या ग्रेटानं जगातल्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेषतः जे पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काम करतात, हवामानात होत असलेल्या बदलांबद्दल जे सजग आहेत आणि तापत जाणारी हवा, सागराच्या सरासरी पातळीत होणारी वाढ, दक्षिण-उत्तर ध्रुव प्रदेशांतल्या घडामोडी, अनेक बेटांची नामोनिशाणी पुसून जाण्याची भीती अशा गोष्टींनी जे अस्वस्थ आहेत, अशा लोकांना ग्रेटा थुनबर्ग हे नाव चांगलंच माहीत आहे. याचं कारण गेल्या वर्षी ग्रेटानं स्वीडनच्या संसदेच्या इमारतीच्या बाहेर 'संप' केला. म्हणजे आपल्या शाळेमध्ये न जाता ती संसदेच्या इमारतीच्या बाहेर बसून राहिली. त्यावेळी तिनं आपल्या मनातले विचार लिहून काढले होते आणि ते तिच्याच परवानगीनं प्रसिद्धही करण्यात आले होते. त्यात तिनं बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ, 'खरंतर हवामानातील बदलाचा हा प्रश्न, हा येणारा काळ कसा असणार आहे, हे नक्की करणारा आहे. काळाला कलाटणी देण्याची शक्ती असणारी ही समस्या आहे... अधिक वाचा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा - डॉ. अरुणा ढेरे