'वयम्' सल्लागार सभा

 

‘वयम्’चे सल्लागार मंडळ एकदम भारदस्त आहे. महाराष्ट्राचे आयकॉन म्हणता येतील अशा व्यक्ती ‘वयम्’च्या सल्लागार मंडळात आहेत.
गुरुवार २५ जून रोजी झालेली ‘वयम्’ कुटुंबाची सभा म्हणजे जणू Galaxy of Stars होती. ‘वयम्’ ला आता दोन वर्षं पूर्ण झाली.
‘वयम्’चे सल्लागार डॉ. अनिल काकोडकर, कुमार केतकर, अच्युत गोडबोले, श्रीकांत वाड, राजीव तांबे, ‘वयम्’चे ज्येष्ठ लेखक आणि शास्त्रज्ञ
डॉ. बाळ फोंडके, ग्यान की’चे प्रदीप लोखंडे व कादंबरी लोखंडे, प्रकाशक श्रीकांत बापट, कलादिग्दर्शक अच्युत पालव, संपादक शुभदा चौकर, लॅबइंडियाचे संचालक श्रीराम भालेराव, सुशील बापट, समीर बापट ही मान्यवर मंडळी या सभेला उपस्थित होती.

मुंबई विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची उपस्थिती हा एक अपूर्व योग होता. ‘वयम्’चे प्रकाशक श्रीकांत बापट आणि सल्लागार मंडळातील मान्यवरांतर्फे डॉ. संजय देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. संजय देशमुख हे मोठे जीवनशास्त्रज्ञ आहेत.
त्यांनी मुंबई विद्यापीठातून १९९० मध्ये जीवनशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. ‘एस. एम. स्वामीनाथन रिसर्च सेंटर- चेन्नई येथे त्यांनी
कोस्टल सिस्टिम्स रिसर्च प्रोग्रामचे संशोधक आणि प्रमुख म्हणून काम केले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) मध्येही ते संशोधक होते.
त्यांनी अनेक संशोधन केले आहेत.
 

 
 
     
 
     

   

बातम्या आणि चालू घडामोडी


‘उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक’ म्हणून ‘वयम्’ला पुरस्कार

बालसाहित्याचा आणखी एक पुरस्कार ‘वयम्’ला जाहीर

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, दादर यांचा दिवाळी अंक स्पर्धा २०१३ चा ‘वयम्’ ला ‘सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार’ मिळाला.

 

+ 

सविस्तर

 

पुरस्कार

 

+ 

सविस्तर

 

प्रकाशन सोहळा व्हिडीओ

 

+ 

व्हिडीओ गॅलरी

 

Our Other Activities :

Our Hotels:

Copyright 2014. by WAYAM    Designed & Developed By : Marathe  Infotech Pvt. Ltd.