निवडक गुरुपोर्णिमा पत्रे भाग- १-

‘वयम्’ मासिकाने आयोजित केलेल्या ‘गुरुपौर्णिमा पत्रलेखन' स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा निकाल ‘वयम्’ मासिकाच्या वेबसाइटवर जाहीर झाला आहे. विजेत्या ३० पैकी काही प्रातिनिधिक पत्रे शेअर करत आहोत.

माझ्या लाडक्या दादाला, (शाळेचे संस्थापक, अरुण ठाकूर यांना-)

दादा मुद्दामच तुला प्रिय, आदरणीय असं काही लिहित नाही कारण तू तर माझा मित्रच आहेस. माझ्या इतर शाळांमधल्या मैत्रिणींना जेव्हा मी तुझ्याबद्दल सांगायचे तेव्हा तुम्ही तुमच्या सरांना अरे-तुरे करता? हा प्रश्न त्यांच्या चेहेऱ्यावर स्पष्टपणे दिसायचा.पण कधी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावंसं वाटलं नाही कारण तुझं आमच्यावरचं प्रेम हेच त्याचं उत्तर होतं.

कालच निमिषने तुझ्यावर लिहिलेला लेख वाचला आणि आपोआप डोळ्यात पाणी आलं तेव्हा मागच्या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची तूझ्या bagची गंमत आठवली आणि पटकन चेहेऱ्यावर हसू आलं. तू गेल्यानंतर इतिहासाच्या प्रत्येक तासाच्या आधी पुन्हा जिन्यात जाऊन उभं राहावं आणि तुझी वाट पहावी असं वाटायचं.आणि जिन्यातून वर्गापर्यंतच्या आपल्या गप्पा आठवायच्या. Lockdown च्या आधी कोणत्यातरी कार्यक्रमाला माईकची खरखर ऐकू आली आणि आम्ही वर्गात शांत बसावं म्हणून तू मुद्दामहून काढणारा माईकचा आवाज आठवला. तो आवाज कितीही कर्कश्श असला तरी त्यातली माया,आपलेपणा,प्रेम आणि तुझा संयम जाणवायचा. तुझ्यावरच्या लेखात तुझा उल्लेख आनंद निकेतनचं खोड असा केला. आता तू नसलास तरी तुझे विचार, तुझी मत, तुझा आमच्याबद्दलचा जिव्हाळा खोडाची भूमिका नेमकी वठवत आहेत. दादा तुझा फोटो जेव्हा जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा कसलीतरी जाणीव करून देतो आणि जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते तेव्हा तू समजावून सांगितलेली INVICTUS कविता आठवते आणि त्या ओळी आपसूक ओठांवर येतात I AM THE MASTER OF MY FATE I AM THE CAPTAIN OF MY SOUL.

-तुझी विद्यार्थी मैत्रीण आभा
नववी, नाशिक

प्रिय आजोबा,

यः प्रेरकः धर्मज्ञः सूचकः विद्वान् च सः गुरुः।
यः अज्ञानस्य तिमिरः ज्ञानस्य प्रकाशेन निवारयति।
तस्मै श्री गुरवे नमः।।

माता, पिता, अध्यापक या सर्वांना वंदन. पण माझे आणखी एक वंदनीय गुरू म्हणजे तुम्ही आजोबा. अठरा विश्वे दारिद्र्य, अज्ञान आणि व्यसन यांच्या विळख्यात तुमचा जन्म झाला. पण तुमच्या या समस्यांना न डगमगता तुम्ही त्यातून मार्ग काढत राहिला.

एक गणवेश आणि शाळेची जुनी पुस्तके यांच्या बदल्यात पडेल ती कामे करत राहिलात आणि मोठ्या जिद्दीने DRDO पर्यंत पोहोचलात. शिक्षणासाठी असणारी तुमची हीच जिद्द मला आई बाबांपासून दूर राहूनही शिक्षण घेण्यासाठी प्रेरक ठरली आहे.

चिखलातल्या कमळाप्रमाणे सर्व व्यसनांपासून दूर राहिलात, हाच इंद्रिय संयम आम्हाला प्रेरित करतो. स्वतःची आर्थिक परिस्थिती सुमार असतानाही गावाकडून पुण्यात येणाऱ्या अनेक जणांना तुम्ही हक्काने निवारा आणि पैशांचीही मदत केली. परोपकार म्हणतात तो हाच.

प्रामाणिकपणा, स्वतःच्या कामावर अमाप निष्ठा, अल्पसंतुष्ट, निरपेक्ष वृत्ती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे स्वच्छ, निर्मळ मन, हे माझे आदर्श आहेत.
खरं तर हे माझं अल्लड वय आहे. पण याच वयात माणूस म्हणूनही मी घडत आहे. त्यात आई बाबांपासून एकटीच दूर राहते. त्यामुळे खूप प्रसंग येतात, जेव्हा माझा मलाच निर्णय घ्यायचा असतो. अशा वेळी फक्त तुमचे स्मरण केले ना तरी योग्य तो निर्णय घेतला जातो.
संस्कार हे रक्तातच असावे लागतात असं म्हणणाऱ्या लोकांना तुम्ही दाखवून दिले, संस्कार हे रक्तावर नाही तर मनावर अवलंबून असतात.

तुम्ही कायम प्रेरणा बनून या आयुष्याचे मार्गदर्शक व्हाल,हाच आशीर्वाद द्या.

-तुमचीच लाडकी
उत्तू(उत्कर्षा)
आठवी, पुणे

A Letter to My Favourite Teacher

Dear Vaidehi Ma’am,

There are so many things I wish I had told you while I occupied a desk in your class. Although I bid you goodbye “online” but wasn’t able to thank you for handling a class renowned for its mischief and sometimes intelligence. I would like to thank you for always choosing kindness when most others would have turned to anger, working as hard as you could everyday no matter how exhausted you were. You not only played a character of a perfect teacher but also a mother and a friend. Making you proud was something I always aimed to do by scoring well in Maths. A subject which I simply disliked but your guidance and belief in me helped me tackle my fear and hatred towards it. Also you are one of the significant reason behind grade 7th -A becoming a most valuable memory of mine. We deserved more of your haul over the coals for being remembered by our mischief than our names, for being the topic of discussion in many of the teachers’ meeting. Thank you for every lesson, piece of advice and vote of encouragement.

Yours lovingly,
Aniha
8th, Nashik

प्रिय क्रांतीबा ज्योतिबा फुले,

मन:पूर्वक अभिवादन!
आपण माझे आदर्श गुरू आहात.सर्व साधारणपणे 'गु' म्हणजे अंधकार व 'रू' म्हणजे नाहीसे करणारा. कोटी-कोटी जनांच्या जीवनातील अंधकार कायमस्वरूपी मिटवण्यासाठी आपण "शिक्षणरुपी" मशाल हातात घेऊन अंधश्रद्धा व अज्ञान हेच मानवाच्या गुलामीचे मूळ आहेत हे जाणून मातृतुल्य हृदयाने समाजाला शिक्षण देऊन विकासाची चालना दिली. शतकानुशतके "स्त्रीला" शूद्र समजून केवळ गुलामीचे जीवन जगावे लागत होते प्राण्यापेक्षाही जास्त स्त्रीची अवहेलना होत असलेली पाहून 'स्त्री' सुद्धा शिकली पाहिजे म्हणून तत्कालीन धर्मशास्त्र व परंपरा देऊन स्वतःची पत्नी सावित्रीबाई यांनास स्वतः शिक्षण दिले. एक पुरुष शिकला तर फक्त एक पुरुषच शिक्षित होतो पण जर एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण समाज व पर्यायाने देशाचे भविष्य प्रकाश झोतात आणू शकते. हा कृतीशील सामाजिक प्रयोग आपण सावित्रीबाईंना शिक्षित करून भारतीय समाजाच्या प्रयोगशाळेत स्वयंसिद्ध करून दाखवलात.याचीच गोड फळे म्हणून आज अनेक भारतीय स्त्रिया यशाची व पराक्रमाची अनेक शिखरे पादांक्रांत करीत आहेत.

आपल्या विज्ञानवादी, व्यासंगी, चिंतनशीलतेला शतशत विनम्र अभिवादन."Teacher is a social engineer." आपण खऱ्या सामाजिक अभियंत्यांच्या स्वरूपात अनेक अनिष्ट सामाजिक रूढींना कालबाह्य ठरविले.

आपल्या प्रभावी शिक्षण पद्धतीने केवळ दोनच वर्षात विज्ञानवादी, कार्यकारणभाव व तर्कसंगती मांडून इंग्रजीत अस्खलीत निबंध लिहिणारी मुक्ता साळवे सारखी निर्भीड विद्यार्थिनी तुम्ही घडविली.

थोडक्यात मी आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन करते आपल्यातील आत्मविश्वास, दुर्दम्य आशावाद प्रचंड विद्वत्ता आणि निर्भिड बाणा या सर्व गुणांचा संगम व त्याला कृतिशील सामाजिक उपक्रमांची जोड यामुळे आपण खऱ्या अर्थाने अभिवादनास पात्र आहात. आम्ही स्त्रिया आपल्या अनंत उपकाराने प्रभावित व उपकृत झालो आहोत. आपणास व आपल्या सारख्या अनंत माझ्या गुरूंना शतशत नमन.

आपली शिष्या,
पश्यना रमेश गायकवाड
दहावी, अहमदपूर

गुरूर्देवो महेश्वरा । गुरूर्साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः

आजोबा मी तुम्हाला गुरू स्थानि मानुन तुम्हाला शतशहा प्रणाम करते. लहानपणी तुमच्या मांडीवर बसुन कॅनव्हस वर होणारी रंगाची उधळण पहातच मी मोठी झाले.त्यामुळे माझ्या हातात ब्रश कधी आला हे कळलेच नाही. मी तुमच्या मार्गदर्शनाखाली चित्रकलेत पारंगत होत गेले.विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसं मिळवलि. तुम्ही माझ्या पाठिमागे खंबिरपणे उभे राहीलात म्झणून हे शक्य झाले.

कला ही माणसाला जिवंत ठेवते याचे मूर्तीमंत उदाहरण तुम्ही आहात. आज वयाच्या ९५व्या वर्षी काढलेली चित्रेदेखील तितकीच जिवंत वाटतात. मला तुमचा खूप अभिमान वाटतो, मी स्वतःला खुप भाग्यवान समजते की, मला तुमच्यासारखे गुरु लाभले. कलेसाठी झोकुन देण्याची वृत्ती, जिद्द, चिकाटी यामुळेच तुम्ही आकाशाला गवसणी घालू शकलात, मोठमोठे पुरस्कार तुम्हाला प्राप्त झाले, तरीही तुमचे पाय जमिनिवरच राहिले. या गोष्टीचा मला खूप गर्व आहे. सामाजिक संस्था, बॅंक्स, सरकारी कार्यालय, हॉटेल्स या ठिकाणी तुमची चित्रे पहावयास मिळतात. अजोबा तुम्ही माझे हिरो आहात. "एखादी कला तुम्हाला भगवंतापर्यंत पोहचवते त्यामुळे प्रत्येकाने एखादा छंद जोपासलाच पाहिजे त्यासाठी तन, मन, धन अर्पण करण्याची तयारि पाहीजे." हे तुमचे म्हणणे अतिशय सार्थ आहे. अजोबा तुम्ही जे.जे स्कूल ओॅफ आर्ट मुंबई येथे शिकत असताना साधारणतः १९४५ च्या ङाकाळात तुम्हाला लाभलेले गुरू त्याचप्रमाणे तुमच्या कॉलेजलेजचे यूरोपियन डीन प्राध्यापक, 'चारलीस जिह्रड' विषयी आजही वयाच्या ९५ व्या वर्षी तुम्ही त्यांच्या विषय बोलताना हरवून जाता.त्यांच्या विषयी आदरभाव व्यक्त करताना आजही तुम्हाला गहिवरून येते. आज हीच भावना मी माझ्या मनात जपण्याचा प्रयत्न करते. आजही तुम्ही गरिब मुलांना विनामूल्य मार्गदर्शन करून, त्याच्या कलेला प्रौस्ताहन देता.
आज मी गुरूपौर्णोमेनिमित्त तुम्हाला वंदन करते व परमेश्वराकडे हीच मागणी करते की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो!

तुमचीच,
अदिती राजेंद्र जोशी
आठवी, पंढरपूर

आम्ही सोशल मीडिया वर आहोत, आमच्याशी कनेक्ट व्हा !