' बाल संस्कार शिबीर '


 

'सार्वजनिक वाचनालय कल्याण' आणि 'वयम्' च्या वतीने 'बाल संस्कार शिबीर' कल्याण येथे २३, २४ व २५ एप्रिल २०१५ रोजी आयोजित केलेल्या पहिल्या दिवसाचे काही छायाचित्र. लेखक राजीव तांबे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते, यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले व बच्चे कंपनीशी खूप गप्पाही मारल्या.

पहिल्या सत्रात :- मीनल दिक्षित यांनी मुलांच्या व्यक्तिमत्व विकास कसे घडवाल या विषयावर मुलांबरोबर व पालकांबरोबर गप्पा मारल्या.
दुसऱ्या सत्रात :- शुभदा चौकार 'वयम्' च्या मुख्य संपादिका यांनी 'काय वाचाल' व 'कसे वाचाल' या विषयावर गप्पा मारल्या.
अश्या रीतीने पहिला दिवस संपला, पुढील दोन दिवसांची धमाल तुम्हांला लवकरच कळवू .

दुसरा दिवस २४ एप्रिल २०१५

बाल संस्कार शिबीराच्या दुसऱ्या दिवशी मुलांनी टाकाऊ पासून टिकाऊचे प्रात्यक्षिक आणि तंत्रज्ञानावर आधारलेला रोबोटीक प्रात्यक्षिकाचा आनंद लुटला.
पहिल्या सत्रात:-  दिनेश म्हात्रे काकांनी कॉरुगेटेड पेपेरपासून ए.सी टोप्या व होडया बनवून दाखवल्या.
दुसऱ्या सत्रात:-  'चिल्ड्रेन टेक सेंटरचे' पुरुषोत्तम पाचपांडे यांनी मुलांसोबत रोबोटिक्सचे प्रात्यक्षिके केली.

 

तिसरा दिवस (समारोप) २५ एप्रिल २०१५

तिसरा दिवस तर मुलांसाठी खास आकर्षक दिवस होता. कारण त्यांना रंगांची आणि सुलेखनाची जादू अनुभवता आली.
जगप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव मुलांच्या भेटीला आले होते. पालव काकांनी मुलांना त्यांच्या कलेने भारावून टाकलं. मुलांना त्यांनी सुलेखनाबाबत मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिकं ही दाखवली.
तीन दिवसांचे हे बाल संस्कार शिबीर मुलांच्या आणि पालकांच्या उत्तम प्रतिसादामुळे यशस्वीरित्या पार पडलं.

 

बातम्या आणि चालू घडामोडी


‘उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक’ म्हणून ‘वयम्’ला पुरस्कार

बालसाहित्याचा आणखी एक पुरस्कार ‘वयम्’ला जाहीर

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, दादर यांचा दिवाळी अंक स्पर्धा २०१३ चा ‘वयम्’ ला ‘सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार’ मिळाला.

 

+ 

सविस्तर

 

पुरस्कार

 

+ 

सविस्तर

 

प्रकाशन सोहळा व्हिडीओ

 

+ 

व्हिडीओ गॅलरी

 

Our Other Activities :

Our Hotels:

Copyright 2014. by WAYAM    Designed & Developed By : Marathe  Infotech Pvt. Ltd.